लाडक्या बहिणींसाठी मे महिन्याचा हप्ता जाहीर| Ladaki bahin yojana may installment



 Ladaki bahin yojana may installment: महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ही अनेक महिलांसाठी आधारवड ठरली आहे. मागील दहा हप्त्यांमधून महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. आता सगळ्यांच्या नजरा अकराव्या हप्त्याकडे लागलेल्या आहेत, आणि दिलासादायक बाब म्हणजे हा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.


लाडकी बहीण योजना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार

या योजनेचा अकरावा हप्ता, जो मे महिन्याशी संबंधित आहे, कधी जमा होणार याबाबत आता अधिक माहिती मिळत आहे. यापूर्वी एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता २ मे २०२५ रोजी खात्यात जमा झाला होता.

काही माध्यमांच्या बातम्यांनुसार, मे महिन्याचा हप्ता याच महिन्याच्या आत जमा होण्याची शक्यता आहे. आज दिनांक १३ मे २०२५ आहे, आणि पुढील १५ दिवसांच्या आत लाडक्या बहिणींना मे महिन्याचा लाभ मिळू शकतो.Ladaki bahin yojana may month installment


मे महिन्याचा हप्ता कोणत्या आठवड्यात मिळणार

अकराव्या हप्त्याची रक्कम मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. मागील काही महिन्यांपासून या योजनेतील हप्ते महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांत जमा होत असल्यामुळे, या महिन्याही त्याच वेळापत्रकानुसार पैसे मिळू शकतात. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा लवकरच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे करणार असल्याचे सांगितले जात आहे.Ladaki bahin yojana May month 11th installment


Ladaki bahin yojana मे महिना अपात्रतेचे निकष

ज्या महिला स्वतः सरकारी नोकरीत आहेत किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी सेवा करत असल्यास, त्या या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणार नाहीत. ट्रॅक्टर वगळता, ज्या महिलांच्या कुटुंबाकडे कोणतेही इतर चारचाकी वाहन आहे, त्यांनाही या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

थोडक्यात सांगायचं झालं, तर वरील अपात्रतेच्या अटींमध्ये जे महिलांचे नाव येते, अशा महिलांना मे महिन्यापासून या योजनेचे पुढील हप्ते मिळणार नाहीत.May month installment date


‘या’ महिलांना मिळणार ३ हजार रुपयांचा हप्ता

मे महिन्याच्या हप्त्यासोबत काही महिलांना एकत्रितपणे ३ हजार रुपयांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. ज्या महिलांना एप्रिलचा म्हणजेच दहावा हप्ता मिळालेला नाही, अशा लाभार्थींना दहावा आणि अकरावा असे दोन्ही हप्ते एकत्र मिळून ३ हजार रुपये मिळू शकतात. मात्र, ज्यांच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता आधीच जमा झाला आहे, त्यांना यावेळी नियमितप्रमाणे फक्त १५०० रुपयांचाच हप्ता दिला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.


लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 वरुन 2100 कधी होणार?

राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत 2 कोटी 52 लाख महिलांना दरमहा 1500 रुपये द्यायचे ठरवले, तर एका वर्षात सुमारे 46 हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. पण जर हा हप्ता वाढवून 2100 रुपये केला, तर सरकारवरचा वार्षिक आर्थिक भार 64 हजार कोटी रुपये इतका होईल. त्यामुळे राज्य सरकारने यावर काय तोडगा काढायचा, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

दरमहा 2100 रुपये कधीपासून मिळणार, याबाबत कोणतीही स्पष्ट तारीख सांगितली जात नाही, असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्यांनी टोला लगावत विचारलं – "लाडकी बहीण आता सावत्र वाटायला लागली आहे का?" त्यांनी पुढे आव्हान दिलं की, जर खरोखरच सरकारला महिलांचा खरा विचार आहे, तर वर्षभराचे 1500 किंवा 2100 रुपये एकरकमी अ‍ॅडव्हान्स स्वरूपात द्या – असं त्यांनी थेट मंत्री गिरीश महाजन यांना उद्देशून सांगितलं.


नमस्कार, मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो

Ladaki Bahin Yojana May update and installment अशा प्रकारच्या योजना नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा. आणि आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद…


Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post